Home Breaking News Nagpur : नागपुरातही अवैध पब, हुक्का पार्लर, टेरेसबार

Nagpur : नागपुरातही अवैध पब, हुक्का पार्लर, टेरेसबार

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांचा आरोप

नागपुर : नागपुर शहरातील रामनगर, वर्धा रोड, रामदासपेठ, धंतोली, लक्ष्मीनगर, सदर, हिंगणा रोड, सीए रोड, सिव्हील लाईन व इतर रहिवासी क्षेत्र मिळून 100 च्या वर रुफ टॉफ हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दिशानिर्देश नुसार रात्री टेरेसवर मध्य रात्री पर्यंत म्युझिक, डीजे वाजवता येत नसतांना रहिवासी भागात म्युझिक सोबत मद्यपार्टी सुरु असते माननीय न्यायालयाचे उल्लघंन उघड्या डोळयाने सुरू आहे. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 सुधारित कायद्याचे सऱ्हास उल्लघंन सुरू आहे.

 

इमारतीचा नकाशा मंजूर करतांना टेरेस खुलेच असले पाहिजे, त्या ठिकाणी कुठलेही व्यावसायिक बांधकाम करणे आणि व्यवसाय करण्यावर बंदी असून सुध्दा खुले आम टेरेस वर पब, बार, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर शहर भर सुरू आहेत. यापैकी अनेकांकडे नगर रचना विभागाची परवानगी नाही, फायर एनओसी नाही, पोलीस परवानगी नाही, जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही, शेजार रहिवासी यांची परवानगी नाही, वाहतुक सुविधा नसल्याने महापालिकेचे अधिकारी, नागपुर सुधार प्रन्यासचे अधिकारी, पोलिस आणि राज्य उत्पादन शुलक अधिकाऱ्यांची समिती स्थापन करुन कारवाई कऱण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे

या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष प्रशांत पवार, महासचिव मिलिंद महादेवकर, उपाध्यक्ष नीलिकेश कोल्हे, विदर्भ विद्यार्थी प्रमुख माधुरी पालीवाल, प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी राहुल कामळे, युवक प्रदेश सचिव नागेश देडमुठे मध्य नागपूर अध्यक्ष रवी पराते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.