Home Breaking News पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात

पुण्याच्या  दोन दुचाकीस्वारांना अलिशान गाडीखाली चिरडणाऱ्या अल्वपयीन मुलाच्या वडिलांना पुणे पोलिसांनी आज पहाटे संभाजीनगर मधून अटक केली आहे. दुपारपर्यंत पोलीस त्यांना पुण्यात घेऊन येणार आहेत.पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघात प्रकरणात, अल्पवयीन मुलागा मद्यपान करतो हे माहिती असूनही, त्याला कार दिल्याने पुणे पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक असलेल्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केला होते.

मात्र, गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलाचे वडिल फरार झाले होते. त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली होती.

अपघातातील कार विनानोंदनी

दरम्यान या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीने मुलाने ज्या कारने अपघात केला होता, ती का विनानोंदनी असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, या प्रकरणाता अल्पवयीन आरोपीला जामिन मिळाला आहे. आरोपीचा जामिन रद्द व्हावा यासाठी पुणे पोलीस सत्र न्यायालयात जाणार आहेत.

गुन्हा अत्यंत क्रूर असल्याने आरोपीला जामीन मिळू नये, अशी भूमिका पोलिसांनी न्यायालयात मांडली होती. न्यायालयाने आरोपीला दिलेल्या जामिनाच्या आदेशाविरोधात आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार आहोत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणूनही प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

ते म्हणाले, अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला आलिशान मोटार चालविण्यास दिली आणि पबमध्ये मद्यसेवनास परवानगी दिली. याबाबत मुलाच्या वडिलांविरुद्ध तसेच हॉटेलमालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा गंभीर असल्याने मुलाविरुद्ध सज्ञान आरोपीप्रमाणे कारवाई करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. परंतु पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली, असा संभ्रम कोणीही मनात ठेवू नये. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपविला आहे. सर्व पुरावे गोळा करण्यात येत आहेत.

नियमानुसार रात्री दीडपर्यंत परवानगी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.  कारवाईसह आणखी ठोस उपाययोजना करण्यात येतील. अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही,” असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.