Home Breaking News सोने-चांदीच्या किंमतीत बदल; जाणून घ्या नवे दर!

सोने-चांदीच्या किंमतीत बदल; जाणून घ्या नवे दर!

Gold-Silver Price Today। सोने- चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमतीने ७० हजारांचा आकडा पार केला आहे. एकीकडे सोने-चांदीचे दर सातत्याने वाढत असल्याने याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे आजही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.त्यानुसार आता १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ७४,६२० झाली आहे. तर चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. प्रतिकिलो चांदीच्या दराने देखील ९० हजारांचा आकडा पार केला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या… Gold Price Today ।

मुंबई
२२ कॅरेट सोन्याचा दर ६८,४०० रुपये
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,६२० रुपये

पुणे
२२ कॅरेट सोन्याचा दर ६८,४०० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,६२० रुपये

नागपूर
२२ कॅरेट सोन्याचा दर ६८,४०० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर७४,६२० रुपये

नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६८,४०० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,६२० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.