Home Breaking News नगर – 96.60 टक्के गुण मिळवून अमृतवाहिनी ची श्रेयशी जाधव प्रथम

नगर – 96.60 टक्के गुण मिळवून अमृतवाहिनी ची श्रेयशी जाधव प्रथम

अहमदनगर: अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून श्रेयशी जाधव हिने ९६.६० टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला.तसेच वीस विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळाले असल्याची माहिती प्राचार्य जे.बी.शेट्टी यांनी दिली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे व संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ने राज्य पातळीवर विविध पारितोषिक मिळवली आहेत.उत्कृष्ट निकाल,गुणवत्तेबरोबर या शाळेचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत असून अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे.स्वच्छ व सुंदर परिसरासह गुणवत्ता आणि निकालाची परंपरा जपताना ५७ विद्यार्थ्यांपैकी यावर्षी ७ विद्यार्थ्यांना ९० टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले आहे.तर वीस विद्यार्थ्यांना ८० त्न पेक्षा जास्त मार्क मिळाले आहे.यावर्षी श्रेयशी जाधव हिने ९६.६० टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला.तर श्रेया परदेशी हिने ९२.६० टक्के गुण द्वितीय क्रमांक मिळवला.सोहम आरगडे व तनिष्का गुंजाळ या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,विश्वस्त शरयू देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,व्यवस्थापक प्रा.विवेक धुमाळ,अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव,प्राचार्य जे.बी.शेट्टी सर्व शिक्षक व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.